Wednesday, February 01, 2006

अपूर्वाई

१८ जून २००५ ला अपूर्व चा जन्म झाला आणि केदारच्या आणि माझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरु झालं. Pregnancy च्या काळात आणि नंतरही babycenter कडून येणारया emails वाचत होते. या emails मधे Tending Violet नावाचं एक खूप छान parenting journal सापडलं. त्याबद्द्ल मी अधूनमधून केदारशी बोलत असे. केदार माझ्या खूप मागे लागला, की तू पण असं मराठीत का नाही लिहीत? ह्या blog ची प्रेरणा त्याने दिली आणि "अपूर्वाई" हे नावही त्यानेच सुचवलं.

Violet ही अपूर्वपेक्षा साधारण महिनाभराने मोठी असेल. त्यामुळे या सदरात वर्णन केलेले अनुभव मलाही येतच होते. म्हणूनच, या सदरातले विचार अमेरिकन संदर्भ वगळून सुद्धा मनाला स्पर्शून गेले.

Tending Violet वाचताना एक गोष्ट सारखी जाणवते आणि ती म्हणजे लेखिकेचा प्रांजळपणा आणि परखडपणा. स्वतःच्या अनेक चुका, संभ्रम, अडचणी याबद्द्ल तिने अगदी मोकळेपणाने लिहिलं आहे. इतक्या मोकळेपणे स्वत:चे विचार मांडण्याची कल्पना माझ्या भारतीय संस्कारात वाढलेल्या मनाला जड वाटते आहे. त्यातच पहिल्यांदाच blog लिहीत असल्यामुळे मनात बराच गोंधळ आहे. तरी तुमच्या सूचना जरूर कळवा.

5 comments:

KedarsThoughtsWork said...

वा फारच छान blog आहे

कल्पना ही सुरेख आहे!

aghal-paghal said...

माझी बायको आणि मी सुद्धा नविन पाहुण्याच्या प्रतिक्षेत आहोत. दोन-अडिच महिन्यात आगमन होणार आहे त्याच/तीच. तुमचे अनुभव वाचायला नक्की आवडेल.

Tending Violet वाचला. बरिच मानसिक तयारी करायला लागणार अस दिसतय. :)

Deepa said...

तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा!

SopanShewale said...

वा फारच छान blog आहे

abhijit said...

blog name is apt.